Menu
blogid : 17656 postid : 704270

उद्योगसंधी

Berojgar Yuva Sanghtan
Berojgar Yuva Sanghtan
  • 8 Posts
  • 3 Comments

बहुतेकांची उद्योग करण्याची इच्छा असते, अनेकजण उद्योग सुरू करतातही, पण उद्योगात यशस्वी होतात. ज्यांना अचूक उद्योगसंधी शोधता येते ते त्या संधीचं सोनं करतात. उद्योगाची निवड हा खूप मोठा प्रश्न अनेकांसमोर असतो. या प्रश्नाचे उत्तर म्हणूनच ‘उद्योग मैत्रीण’तर्फे उद्योगसंधी हा अंक प्रकाशित करण्यात आला आहे.
‘उद्योगसंधी’ या उद्योग मैत्रीणच्या अंकामध्ये सेवा क्षेत्रातील- ब्यूटी इंडस्ट्री, निसर्गोपचार केंद्र, फिटनेस सेंटर, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल, मोबाइल रिपेअरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट अशा व्यवसायांविषयी, प्रिंटिंग क्षेत्रातील प्रिंटिंग बिझनेस, मिनी ऑफसेट प्रिंटिंग बिझनेस, संगणक क्षेत्रातील संधी, डीटीपी बिझनेस अशा उद्योगसंधी, अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रात वैविध्यपूर्ण मसाल्यांचा व्यवसाय, कॅटरिंग, बेकरी

व्यवसाय, वेफर्सचा व्यवसाय अशा उद्योगांविषयी कृषी उद्योग क्षेत्रातील उद्योगामध्ये काजू प्रक्रिया उद्योग, अ‍ॅग्रो टुरिझम, वनौषधी तेलनिर्मित उद्योग, नैसर्गिक खतनिर्मिती उद्योग, विविध उद्योगसंधींमध्ये लग्नसराईतील उद्योगसंधी, बुटिक शॉप, लेदर टेक्नॉलॉजी, प्लॅस्टिक व्यवसायाविषयी महिती अचूक देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय लघुउद्योजकांसाठी अर्थसहाय्याच्या योजना, उद्योग संदर्भातील महत्त्वपूर्ण कार्यालये, उद्योजकता प्रशिक्षणांविषयी उद्योगसंधी
अफाट आहेत, पण त्या संधीचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी प्रचंड मेहनत, बाजारपेठ सर्वेक्षण, उत्पादनाची माहिती, ज्ञान व कौशल्य मिळवणे खूप गरजेचे आहे. विविध उद्योगसंधींवर प्रकाशझोत टाकणारा ‘उद्योगसंधी’
हा अंक विविध उद्योगसंधींच्या शोधात असणाऱ्यांना निश्चित उपयोगी ठरेल.
एखादा स्वयंरोजगार सुरू करावयाचा म्हटला की, त्यातील खाचाखोचा, त्याबद्दलचे काही खास ठोकताळे माहिती करून घेणे आवश्यक असते. कारण व्यवसाय म्हटला की, पैशाचे व्यवहार येतात, त्यामुळे विचार करून व्यवसाय सुरू करावा. उद्योग करायचे ठरवल्यानंतर सर्वात प्रथम आपण आपल्याला जे उत्पादन उत्पादित करावयाचे आहे किंवा जी सेवा द्यायची आहे त्याची परिपूर्ण माहिती करून देणे महत्त्वाचे आहे.

Read Comments

    Post a comment

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    CAPTCHA
    Refresh